Belagavi

शर्वरी दड्डीकरचा डीपी शाळेतर्फे सन्मान

Share

बेळगावातील टिळकवाडीमधील डिव्हाईन प्रोव्हिडन्स (डीपी)कॉन्व्हेंट हायस्कूलची विद्यार्थिनी शर्वरी गणेश दड्डीकर व बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनची स्केटर हिचा डीपी शाळेतर्फे सन्मान करण्यात आला. तिने प्रचंड मेहनत करून स्केटिंगमध्ये राष्ट्रीय पदक मिळवल्याबदल तिचा हा सन्मान करण्यात आला.

हा कार्यक्रम डीपी शाळेच्या शाळेच्या आवारात घेण्यात आला. शर्वरी दड्डीकर हिचा सन्मान मुख्याध्यापिका सिस्टर रोसाम्मा जोसेफ, सिस्टर एलमा बार्थोलोमीव, सिस्टर एल्सा सबस्तीन, पी. टी. शिक्षक सिल्व्हिया डी लिमा, शिक्षिका मोनिका हे सर्व जण उपस्थित होते. या वेळी शाळेने शर्वरीचे पालक गणेश दड्डीकर आणि वृषाली दड्डीकर तसेच प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यांचे धन्यवाद मानले.

Tags: