Vijayapura

तोंड बांधलेल्या अवस्थेत सापडली मगर

Share

विजापूर जिल्ह्यातील कोल्हार शहराजवळील कृष्णा नदीच्या पुलावर तोंडाला दोरी बांधलेल्या अवस्थेत मगर आढळून आली.

अन्यत्र कुठल्यातरी भागात ही मगर गेली असताना , बहुधा तिला पकडून , तिथल्या नागरिकांनी तिच्या तोंडाला दोरीने बांधले असावे . मात्र त्यावेळी ह्या मगरीने पलायन केले असावे . रस्त्याच्या मधोमध मगर दिसल्याने वाहनधारक हैराण झाले आहेत.

कोल्हार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वनाधिकाऱ्यांना माहिती दिली. मगरीच्या तोंडाला बांधलेली दोरी सोडून , मगरीला वन अधिकारी कृष्णा नदीत सोडणार आहेत. या ठिकाणी मगर पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे .

Tags: