Belagavi

चन्नराज हट्टीहोळी यांनी केली राजहंसगडावरील मंदिरात विशेष पूजा

Share

बेळगावमधील येळ्ळूर येथील राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या लोकार्पणकरण्याच्या पार्श्वभूमीवर, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी त्याचप्रमाणे ,युवा काँग्रेस नेता मृणाल हेब्बाळकर यांनी किल्ल्यावरील मंदिरात विशेष पूजा केली .

बेळगाव ग्रामीण मतदार संघातील राजहंसगड किल्ल्याच्या ऐतिहासिक केंद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे . त्यानिमित्ताने शनिवार तसेच रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . पुतळा लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर , बेळगाव ग्रामीणच्या आ . लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू तसेच विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी व सुपुत्र युवा काँग्रेस नेता मृणाल हेब्बाळकर यांनी एकत्र येऊन विशेष पूजा व अभिषेक केला .

यावेळी आ . लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वतः गडाला भेट देऊन , शिवछत्रपतींच्या पुतळ्याला वंदन करून तिथली पाहणी केली . त्याचप्रमाणे , राजहंसगडावर होणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पणाच्या सोहळ्यात सहभागी होण्याचे आव्हान केले .

Tags: