Belagavi

बेळगावात जिल्हास्तरीय विज्ञान-तंत्रज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा

Share

समग्र शिक्षण कर्नाटक आणि अगस्त्य फाऊंडेशन बेळगाव यांच्या वतीने अकामाई टेक्नॉलॉजीच्या प्रायोजकत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील इयत्ता 6 वी आणि 7 वी च्या शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे ‘वॉल्कोवाक्यम’ जिल्हास्तरीय ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रश्नमंजुषा’ घेण्यात आली.

मुलांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना अगस्त्य फौंडेशनच्या उत्तर कर्नाटक व गोवा विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापक डॉ. बबिता गुप्ता म्हणाल्या की, अगस्त्य फाऊंडेशनचा उद्देश शाळांमध्ये विज्ञानाचे ज्ञान देणे आणि मुलांना स्पर्धेसाठी खास तयार करणे. सरकारी शाळांमधील मुलांनाही खासगी शाळेतील मुलांप्रमाणे स्पर्धात्मक ज्ञान मिळावे हा आहे.

प्रमुख पाहुणे बेळगाव शहर झोनचे क्षेत्रीय समन्वयक आय. डी. हिरेमठ म्हणाले की, शालेय स्तरावर विशेषतः सरकारी शाळेतील मुलांना विज्ञान व तंत्रज्ञानाची व्यावहारिक माहिती देणारे अगस्त्य संस्थेचे कार्य खरोखरच अनुकरणीय आहे.

त्यानंतर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून आलेल्या 210 हून अधिक विद्यार्थ्यांना पहिल्या प्राथमिक फेरीत 20 गुणांचे लेखी विज्ञान प्रश्न विचारण्यात आले ज्यातून 8 उत्कृष्ट संघांची निवड करण्यात आली. त्यानंतर प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांच्या त्या 8 संघातील मुलांनी आधुनिक मॉडेलमध्ये स्क्रीनवर सचित्र प्रश्न विचारून 5 टप्प्यात विशेष प्रश्न विचारले, पासिंग राउंड, बजर राऊंड इशारे देऊन सर्वोत्कृष्ट 3 संघांना 3 उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक विश्वेश्वरय्या नगर कन्नड शाळा क्र.

26 च्या वरुण मेत्री आणि अक्षरा कोडली यांनी, बैलहोंगल तालुक्याच्या कन्नड शाळा हन्नीकेरी स्कूलच्या सिद्धार्थ भावी आणि किरण मदलुर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला, तर बेळगाव तालुक्याच्या केएचपीएस मुतगा शाळेच्या हंसिका सूर्यवंशी आणि निवेदिता हंचिनमनी यांनी तिसरा क्रमांक पटकावला. सांबरा शाळेच्या श्रावणी तिप्पानाचे व संगीता पाटील यांच्या संघाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.

पहिले 12000, दुसरे 9000, तिसरे 6000. आणि प्रत्येकी 3000 रुपयांची 3 उत्तेजनार्थ पारितोषिकांसह प्रमाणपत्रे, पदके आणि विशेष पारितोषिके देण्यात आली. सर्व सहभागी मुलांना व मार्गदर्शक शिक्षकांना विशेष पारितोषिक व स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध शाळांतील मुले, शिक्षक व पालकांसह अगस्त्य संस्थेचे मार्गदर्शन साधन शिक्षक व विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. बसवराज रामदुर्गे यांनी नाविन्यपूर्ण, पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. संस्थेचे अधिकारी शिवानंद चलवादी यांनी परीक्षक, तर श्रीपाद देसाई यांनी तांत्रिक सहाय्यक म्हणून काम पाहिले.

Tags: