Belagavi

राजहंसगड विकास आणि शिवाजी पुतळ्यासाठी काँगेसने एक रूपया जरी निधी दिला असल्यास करावे सिद्ध

Share

२०१३ ते २०१८ सालापर्यंत राज्यात काँगेस सरकार होते . राजहंसगडाच्या विकासासाठी , शिवाजी महाराज पुतळा आणि किल्ला परिसर विकासासाठी एक रुपयाही दिलेला नाही . जर काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात राजहंसगडाच्या विकासासाठी एक रुपया जरी दिला असेल तर त्यांनी ते सिद्ध करून पुन्हा उदघाटन करावे आमची काही हरकत नाही असे , मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले

बेळगावच्या राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते . यावेळी , बेळगाव ग्रामीणच्या आमदारांनी शिवाजी महारांजाच्या पुतळ्याच्या बांधकामाचे कार्य केले असताना तुम्ही हा पुतळा अनावरणाचा कार्यक्रम कसा केलात या प्रश्नाचे उत्तर देताना , मुख्यमंत्री म्हणाले कि या प्रश्नाचे उत्तर तुम्ही त्याच्याकडेच मागा . सरकारने यासाठी निधी दिला आहे , हा शासकीय कार्यक्रम आहे .

भाजप सरकार सत्तेत आल्यावर , आम्ही छत्रपतीला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि राजहंसगड परिसराच्या विकासासाठी आम्ही प्रथम ५० लाखांचा निधी दिला . त्यानंतर काम सुरु केले . त्यानंतर आणखी निधी दिला . हा पुतळा सरकारच्या अंतर्गत आहे . त्यामुळे हा शासनाचा कार्यक्रम आहे . तो कधी आणि कसा घ्यायचा हे शासन ठरवेल . काँगेस पक्षातर्फे अनावरणाचा कार्यक्रम करायचा असेल तर त्यांना जरूर करू द्या आमची काही हरकत नाही असे मुख्यमंत्री म्हणाले . सिद्धरामय्या यांच्या , प्रजाध्वनी यात्रेसाठी येणाऱ्यांना पाचशे रुपये द्या या वक्तव्याच्या व्हायरल व्हिडिओबद्दल पत्रकारणॆ विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ,मुख्यमंत्री म्हणाले कि , ही काँग्रेसची जुनी संस्कृती आहे . आता ते आपल्या तोंडाने सांगत आहे इतकेच ..

एकंदर राजहंसगड आणि शिवाजी पुतळ्यासाठी भाजप सरकारनेच निधी दिल्याचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी ठासून सांगितले .

Tags: