Belagavi

बसुर्ते मराठी उच्च प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन

Share

बेळगाव तालुक्यातील बसुर्ते मराठी उच्च प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध अनोख्या विज्ञान प्रतिकृती सादर करून आपल्या प्रतिभेचे दर्शन घडविले.

बसुर्ते मराठी उच्च प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विध्यार्थ्यांच्या प्रतिभाशक्तीला वाव देण्यात आला. यावेळी विध्यार्थ्यानी कल्पकतेने साकारलेल्या विज्ञान प्रतिकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. शिनोळी (ता. चंदगड) येथील नागराज कांबळे, उचगाव विभाग केंद्र संसाधन व्यक्ती छाया बजंत्री आणि मान्यवरांच्याहस्ते प्रतिमा पूजन, फीत कापून व दीप प्रज्वलनाने राष्ट्रीय विज्ञान दिन व विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले

या प्रदर्शनात विध्यार्थ्यानी सौर ऊर्जा, पवन चक्की, पर्यावरणपूरक माझे गाव मॉडेल, घनता, हवेला वजन असणे, आम्ल-अल्कली यांचे गुणधर्म, ट्रॅफिक इंटरसेक्शन प्रोजेक्ट्स आदी विविध प्रकल्प सादर केले. शिक्षकांच्या मदतीने सादर केलेल्या या प्रकल्पांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष उमेश नाईक होते. प्रमुख पाहुणे म्हणून दत्तात्रय बेनके, सूरज सुतार, लक्ष्मी कुराडे, एसडीएमसी उपाध्यक्षा निर्मला हन्नुरकर, सदस्य जोतिबा गोजगेकर, शिवाजी नाईक आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका एस. जी. ताशिलदार यांनी पाहुण्यांचे पुष्प देऊन स्वागत करून प्रास्ताविक केले. शिक्षक एन. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. एन. पाटील यांनी आभार मानले.

Tags: