फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा यंदा उत्पादनाअभावी महागला आहे . त्यामुळे आंबाप्रेमींची निराशा झाल्याचे एसके फ्रूट्सचे मालक सलीम गोलावले यांनी सांगितले.
शहरातील फळ मार्केटमधील एस.के. फ्रूट्सचे मालक सलीम गोळवले यांनी सांगितले कि , यंदा आंब्याचा हंगाम उशिरा सुरु झाला आहे. बदलत्या हवामानामुळे , गतवर्षीच्या तुलनेत यंदा आंब्याचे उत्पादन कमी असल्याने यंदा दर थोडा जास्त असेल . महाराष्ट्रातील देवगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात विविध जातींचे आंबे राज्यात दाखल झाले आहेत. या आंब्यांना मोठी मागणी आहे.

पण कर्नाटक राज्यातून आंबे बाजारात येण्यासाठी आणखी एक महिना लागेल . त्यामुळे या आंब्याच्या सव्वा डझनाच्या एका पेटीची किंमत सुमारे १८०० ते २५०० रुपयांपर्यंत वाढली आहे.
यंदा आंबा उत्पादन घटल्याने फळांचा राजा आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे


Recent Comments