Dharwad

नवलगुंद प्रजाध्वनी यात्रेत लोकांनी घातला गोंधळ

Share

धारवाडमधील नवलगुंद प्रजाध्वनी यात्रेत , लोकांनी घातलेला गोंधळ पाहून , माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतप्त होऊन त्यांनी भाषण न करण्याची भूमिका घेतली . मात्र काँग्रेस नेत्यांनी त्यांचे मन वळवून भाषण करायला लावले .

पक्षाच्या नवलगुंद शहरात झालेल्या प्रजाध्वनी यात्रेच्या मेळाव्यावेळी , लोकांचा गोंधळ पाहून माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाषण
करायचे सोडले आणि ते संतप्त झाले.

प्रजाध्वनी भव्य शोभायात्रेनंतर संमेलनही झाले. यावेळी सिद्धरामय्या बोलत असताना लोक उभे राहिले आणि घोषणाबाजी करू लागले. सिद्धरामय्या भाषण करत असताना सर्वांना शांत राहण्यास सांगून देखील जनता शांत झाली नाही, तेव्हा मी भाषण करणार नाही, अशी भूमिका सिद्धरामय्या यांनी घेतली . त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सिद्धरामय्या यांचे मन वळवले आणि त्यांना बोलू दिले.

Tags: