Hukkeri

गुरुपूजेनिमित्त मंदिर आणि नदी स्वच्छता मोहीम : मारुती मोरे.

Share

गुरुपूजा दिवसाचा एक भाग म्हणून हुक्केरी तालुक्‍यातील बडकुंद्री होळेम्मा मंदिर आणि हिरण्यकेशी नदी स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले आहे, असे हुक्केरी संत निरंकारी मंडळाचे विभागीय प्रमुख, समन्वयक आणि ज्ञान प्रचारक मारुती मोरे यांनी सांगितले.

हुक्केरी तालुक्यातील हिरण्यकेशी नदी आणि नदीकाठच्या होळेम्मा मंदिर परिसराची स्वच्छता सुरू केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मारुती मोरे यांनी सांगितले की, बाबा हरदेव सिंह महाराज यांच्या शिक्षाप्रेरणा आणि अमृत स्वच्छ जल, स्वच्छ माणूस प्रकल्पाचा एक भाग म्हणून संत निरंकारी मंडळाचे कर्नाटक विभाग समन्वयक सुनीलकुमार यांच्या आदेशानुसार सुमारे 200 सेवादल सदस्यांच्या सहभागाने सेवा कार्य सुरू आहे. होळेम्मा देवी ट्रस्ट कमिटी आणि बडकुंद्री ग्रामपंचायत अध्यक्ष इरप्पा कोटबागी यांच्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत असे ते म्हणाले.

संत निरंकारी मंडळाच्या सदस्यांनी नदीकिनारी व मंदिर परिसर पूर्णपणे स्वच्छ करून कचऱ्याची विल्हेवाट लावली.
नंतर होळेम्मा देवी मंदिर ट्रस्ट कमिटीचे सदस्य, मुख्य पुजारी एच. एल. पुजारी म्हणाले की, नुकतीच होळेम्मा देवी जत्रा महिनाभर चालली होती आणि मंदिर परिसर भक्तांच्या कचरा आणि टाकाऊ पदार्थांनी भरून गेला होता. पर्यावरण रक्षण हे आपल्या सर्वांसाठी एक उदाहरण आहे, असे ते म्हणाले.

यावेळी निरंकारी मंडळ चॅरिटेबल फाऊंडेशन, नवी दिल्लीचे सदस्य मारुती मोरे, बी. आर. जाधव, शिद्दू बेनाडीकर, अण्णासिंग पाटील, दिलीप मेदार, भागोजी कलगुडे, अशोक कागले, केम्पण्णा आंबळे, डॉ. माळी, सुनिल भोसले, बी. एस. निंबाळकर व हुक्केरी, दड्डी, रायबाग, मोरब, कंचरवाडी, निलजी, गावातील निरंकारी सेवा दलाचे सदस्य उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत भाग घेतला.

Tags: