Kagawad

कागवाड तालुका काँग्रेसच्या अध्यक्षांवर चाकू हल्ला

Share

कागवाड तालुक्यातील ऐनापूर शहरातील सुपुत्र, कागवाड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत अपराज यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी वार करून जखमी केलेल्या प्रकरणाचा तपास त्वरीत व्हावा व गुन्हेगारांना अटक करावी या मागणीसाठी ऐनापुर रमध्ये काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी एकजूट दाखवत आंदोलन केले.

कागवाड ब्लॉक युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत अपराज यांच्यावर हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी प्रशांतची दुचाकी अडवली, त्याला शिवीगाळ करून, त्याच्या पोटात, हातावर व पाठीवर चाकूने वार करून पळ काढला. या घटनेचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ऐनापूर येथे आंदोलन करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.

प्रशांत अपराज हा मूळचा ऐनापूर शहरातील आहे. भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासोबतच माजी आमदार राजू कागे यांच्यासह कागवाड मतदारसंघातील पक्ष संघटना आणि निवडणुकीच्या तयारीतही त्याचा सहभाग होता.

एका अज्ञात हल्लेखोराने भरदिवसा प्रशांतवर अचानक हल्ला केला आणि त्याला शिवीगाळ केली. एवढेच नाही तर त्याने धमकीही दिली आहे. तोपर्यंत प्रशांतने आपला जीव मुठीत घेऊन पळ काढल्याने आरोपी तेथे लोकांच्या येण्याच्या आधीच पळून गेला.

सध्या प्रशांतवर कागवाडच्या सार्वजनिक तालुका रुग्णालयात उपचार सुरु सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे . घटनेचे वृत्त समजताच माजी आमदार राजू कागे यांनी रुग्णालयात धाव घेत प्रशांतच्या प्रकृतीची विचारपूस तर केलीच, शिवाय त्याला धीरही दिला.

याप्रकरणी कागवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भादंवि कलम 307, 341, 323, 501 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास तीव्र केला आहे. डीवायएसपी श्रीपाद जडे यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय हनुमंत नरळे यांनी तपास हाती घेतला आहे.

प्रशांत अपराजवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्याच्या गावी ऐनापूर येथे निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला. राजकीय वैमनस्यातून आपल्यावर हल्ला झाल्याचा संताप प्रशांतने व्यक्त केला.

यावेळी आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या अदृश्य हातांवर कडक कारवाई करावी. हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी त्यांनी केली . अटकेचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले .

प्रशांत अपराजवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी ऐनापूर बंदची हाक देण्यात आली होती. पीकेपीएस अध्यक्ष कुमार अपराज यांनी सांगितले की, डीवायएसपी श्रीपाद जडे आणि सीपीआय रवींद्र नायकोडी यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष यल्लाप्पा शिंगे, प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ते राहुल मचकनूर, नेते शिवू गुड्डापुरे, प्रवीण गाणींगेर , अरुण गाणींगेर कुमारा अपराज, संजय भिरडी, गुरुराज मडिवाळर , संजय कुसनाळे, बसनगौडा पाटील उमेशराव पाटील , रफिक जमादार, बसवराज पाटील, प्रकाश कांबळे, संबाजी वाघमोडे, अक्षय नंदगावे, मल्लू कोलार, संदीप माणगावे , रावसाब पाटील, शीतल बालोजी, मंजुनाथ कुचनुरे, राहुल बनजवाड , सुरेश आदिसेरी यांच्यासह शेकडो काँग्रेस नेते व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

Tags: