निप्पाणी तालुक्यातील बेडकिहाळ गावातील प्रगतशील शेतकरी पद्माकर पाटील हेरवडे यांच्या शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीत एका गायीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

शेतीची अवजारे, कापणीसाठी आणलेल्या साहित्याला आग लागली. सुमारे चार लाख रुपये किमतीच्या घरगुती वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचा अंदाज आहे. गोठ्यावर प्लास्टिकचा काळा कागद झाकलेला होता. मध्यरात्री 12 नंतर ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. पद्माकर पाटील हे सकाळी शेतात गेले असता, त्यांच्या निदर्शनास ही घटना आली. त्यामुळे पद्माकर पाटील यांना धक्काच बसला.
ग्राम लेखापाल ए. एन. नेमन्नवर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक कुमार शास्त्री, निप्पाणी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी जयकुमार कंकणवाडी, बेडकिहाळ पशुवैद्यकीय अधिकारी शिवानंद तावदारे आणि अक्षय आमगौडनवर यांनी घटनेचा पंचनामा केला. सदलगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


Recent Comments