अरभावी मतदार संघामध्ये राजकीय बदलाचे वारे वाहत असून , जनता भाजपच्या कारभाराला कंटाळून गेली आहे . यावेळी काँग्रेस पक्षाला निवडून आणण्याचा निर्धार जनतेने केला असल्याचे अरभावीचे काँग्रेस नेते अरविंद दलवाई यांनी सांगितले .
बेळगावमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले कि , अरभावी मतदार संघातील जनता भाजपच्या आमदारांच्या व्यवहाराला कंटाळून गेली आहे . अरभावी मतदार संघाचे आमदार अरभावीचा विकास करण्यात आणि जनतेला न्याय देण्यात असफल झाले आहेत . त्यामुळे त्यांना हटवून , यावेळी काँग्रेसचा आमदार निवडून देऊन काँग्रेसला संधी द्यायचा निर्धार जनतेने केला आहे . मी सुद्धा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहे . गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेस पक्षासाठी कार्य करीत आहे . काँगेस पक्ष निवडून येईल असा विश्वास आहे . जिल्हा पंचायत , ग्राम पंचायत , व्याप्तीत सर्व विकास कामे , मूलभूत सिविधा , रस्ते , शुद्ध पिण्याचं पाणी , याना आम्ही प्राधान्य देऊ ,शिवाय पावसाळ्यात महापुरामुळे हानी होणाऱ्या गावातील लोकांना कायमस्वरूपी परिहार उपलब्ध करून देऊ असे सांगितले . प्रजाधवानी यात्रेसाठी जेव्हा सिद्धरामय्या येतील त्यावेळी यासंदर्भात आपण बोलणार असल्याचे अरविंद दलवाई यांनी सांगितले .
त्याचप्रमाणे , गोकाक तालुक्यातील कौजलगी येथे , प्रतिष्ठित केएलई संस्था आणि सिधुताई महादेवराव दलवाई संस्थेच्या वतीने, गोकाक आणि मुडलगी
तालुक्यातील सर्व गावातील लोकांसाठी , मोफत आरोग्य तपासणी शिबीर , उपचार आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली . केएलई संस्थेच्या वतीने , वेगवेगळ्या आजारांवरील तज्ज्ञ डॉक्टर्स या शिबिरात सहभागी होऊन शिबिरार्थींची तपासणी करणार आहेत . पत्रकार परिषदेमध्ये केएलई संस्थेचे डॉ . अल्लमप्रभू तसेच जेष्ठ काँग्रेस नेते गुंडाप्पा कमते आणि इतर उपस्थित होते .


Recent Comments