Belagavi

आणि खा . मंगला अंगडी झाल्या भावुक

Share

बेळगाव रेल्वे स्थानकाचे सुसज्ज अशा रेल्वे स्थानकामध्ये रूपांतर करण्याचे दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे स्वप्न साकार होऊन , पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याचे पाहून , खा . मंगला अंगडीना अश्रू अनावर झाले .

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले कि ,बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्याचे दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे स्वप्न होते . ते आज साकार होत आहे. बेळगाव रेल्वे स्थानक सुसज्ज आणि अद्ययावत स्वरूपात साकारण्यात आले आहे . यासाठी संबंधित विभाग , राज्य सरकार तसेच इथल्या रेल्वे अधिकाऱ्यांसहित सर्वांचे सहकार्य लाभले . यासाठी सर्वाना धन्यवाद देते .

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या रेल्वे स्थानकाचे उदघाटन करणार आहेत याचा मला खूप आनंद होत आहे असे म्हणत असताना त्या अत्यंत भावुक झाल्या . त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले .

 

Tags: