पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर , कार्यक्रम आणि रोड शोची बेळगाव शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून ,सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली आहे . पंतप्रधानांचा रोड शो हा ऐतिहासिक ठरणार आहे अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आ . अभय पाटील याची दिली .
शहरात माध्यमांना माहिती देताना त्यांनी सांगितले कि , बेळगावच्या सांबरा विमानतळावर विशेष विमानाने त्यांचे आगमन होईल, तेथून पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने शहरातील एपीएमसी केएसआरपी ग्राउंड हेलिपॅडवर उतरतील. 10 किमीचा नमो रोड शो एपीएमसी मैदानापासूनच होणार आहे. पीएम मोदी एपीएमसी ते राणी चन्नम्मा सर्कल, संभाजी सर्कल, टिळक चौक, शनी मंदिर, शिवाजी उद्यान, शिवचरित्र मार्ग ते एसपीएम रोड, येडियुरप्पा मार्ग ते मालिनि सिटी असा रोड शो करणार आहेत. पंतप्रधान ज्या ठिकाणी जात आहेत त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. रोड शोच्या मार्गावर भगवे झेंडे उंच उंच फडकत असून पारंपरिक पेहराव आणि पेटा परिधान करून 10,000 महिला पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. तसेच पंतप्रधानांच्या मार्गावर शिवाजी महाराज, राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा यांच्यासह विविध महापुरुषांच्या ऐतिहासिक आणि पारंपारिक नृत्यांचा लाईव्ह शो होणार आहे.
पंतप्रधानांच्या आगमनानंतर बेळगावमध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. सुरक्षेसाठी सीआरपीएफचे एक हजाराहून अधिक जवान सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत, रोड शो मार्गासह महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही निगराणीही बसवण्यात आली असून, पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. तरीही देशात प्रथमच पाच कायक योगी पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत. विमानतळावर ऑटोचालक, विणकर, शेतकरी महिला, बांधकाम कामगार, नागरी कामगार मोदींचे स्वागत करतील. असे आ . अभय पाटील यांनी सांगितले .

तर आ . अनिल बेनके यांनी देखील पंतप्रधानांच्या बेळगाव दौऱ्याबद्दल माहिती देताना सांगितले कि , बेळगावच्या केएसआरपी ट्रेनींग स्कुलच्या मैदानापासून पंतप्रधानांच्या रोड शो होणार आहे . बेळगावमध्ये पंतप्रधानांचा हा पहिलाच ऐतिहासिक असा रोड शो होणार आहे . सुरक्षेच्या दृष्टितने सर्व खबरदारी घेण्यात आली आहे . सर्व जनतेने मोदींच्या या रोड शो मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले .
धान नरेंद्र मोदी बेळगाव दौऱ्यावर येणार असून, संपूर्ण कुंदानगरी बेळगाव पीएम मोदींच्या स्वागतासाठी नववधूसारखी सजली आहे.


Recent Comments