Belagavi

राजहंसगडावरील कार्यक्रम हा भाजपचा नाही तर संपूर्ण सरकारी कार्यक्रम

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जिल्ह्यात आगमनाने आपल्या सर्वांसाठी उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे मत माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

शहरातील भाजप जिल्हा कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत हा आनंदाचा क्षण असून, मोदींचे चाहते त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शिवाजी पुतळा विकास कामांसाठी निधी देण्यास मी कधीही आडकाठी आणली नाही. याबाबत काँग्रेस आमदारांनी केलेला आरोप खोटा आहे. याबाबत मी तत्कालीन पर्यटनमंत्र्यांवर कधीही दबाव आणला नाही. मी असे खालच्या पातळीवरचे राजकारण कधीच करणार नाही. मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो कि मी असे काम कधीच केले नाही असे म्हणत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना पलटवार केला.

बेळगाव तालुक्यातील राजहंसगड येथील शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते होणार आहे. नंतर नंदगडमध्ये होणाऱ्या भाजप पक्षाच्या वतीने विजय संकल्प रथयात्रेत सहभागी होणार असून केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कार्यक्रमाचा शुभारंभ करतील, असे त्यांनी सांगितले.

शिवाजी पुतळ्याबद्दल मी कधीच बोललो नाही. पण काँग्रेसने हा कार्यक्रम स्वतः करायचा ठरवल्याने आम्हाला तिथे जायचे आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. 2 मार्च रोजी राजहंसगड येथे होणार छत्रपती शिवाजी मूर्ती अनावरणाचा कार्यक्रम हा फक्त भाजपचा हा कार्यक्रम नाही. हा संपूर्ण सरकारी कार्यक्रम आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार शिष्ठाचार पाळून सौजन्याने येणार आहेत. मी पण येणार आहे ते म्हणाले .

काँग्रेस पक्षाप्रमाणेच पक्षश्रेष्ठींसोबत 8 मार्च रोजी मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचे आम्ही आधीच ठरवले आहे. भाजप पक्षश्रेष्ठींच्या भेटीवर भाष्य न करता त्यांनी मौन तोडले. मराठा समाज अतिशय हुशार आहे. अशा इमोशनल ट्रिगर्सना पुढच्या निवडणुकीत धडा शिकवला जाईल. रमेश जारकीहोळी यांनी 27 फेब्रुवारी आणि 2 मार्चचा महत्त्वाचा कार्यक्रम संपल्यानंतर बेळगाव ग्रामीण मतदान मतदारसंघात निवडणूक जिंकण्यासाठी व्यूहरचना रचली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय पाटील, किरण जाधव, धनंजय जाधव, दीपा कुडची, नागेश मंडोळकर, आदी होते.

Tags: