हुक्केरी शहरात ८ ते १० मार्च या कालावधीत मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती हिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष निखिल कत्ती यांनी दिली .

हुक्केरी शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, दिवंगत उमेश कत्ती यांच्या 14 मार्चला जयंतीनिमित्त 8 मार्चपासून तीन दिवस मोफत नेत्रतपासणी व उपचार करण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे तालुक्यातील जनतेला हुक्केरी सार्वजनिक हॉस्पिटल येथे नोंदणी करून उपचार घ्यावेत.

त्यानंतर पवन कत्ती म्हणाले कि , 1 आणि 2 मार्च रोजी हुक्केरी शहरातील एसके हायस्कूलच्या मैदानावर कित्तुर चन्नम्मा नाटकाचे सादरीकरण करण्यात आले असून, स्वातंत्र्ययुद्धात इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या चन्नम्मा या शूर महिलेच्या देशभक्तीचा परिचय करून देण्यात आला आहे. धारवाडच्या रंगायण कलाकारांनी आणि तालुक्याच्या हत्ती, घोडे, उंटांनी भव्य नाटक सादर केले. लोकांनी ते जरूर बघावे असे आवाहन केले .
यावेळी संगम शुगरचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, पृथ्वी कत्ती , अशोक पट्टणशेट्टी, नगराध्यक्ष ए.के.पाटील, रायप्पा डुग, महावीर निलजगी, राजू मुन्नोल्ली, श्रीशैल मगदुम्म, मिर्झा मोमिन व तालुक्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुडची उपस्थित होते.


Recent Comments