Dharwad

प्रल्हाद जोशींच्या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांनी घेतला समाचार

Share

काँग्रेस इतकी वर्षे वाट का पाहत होती? या केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वक्तव्याचा धारवाडच्या काँग्रेस नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

एआयसीसी सदस्य दीपक चिंचोरे, पीएच निरलकेरी, नागराज गोवरी, अल्ताफ हल्लुर यांनी धारवाडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. प्रल्हाद जोशी यांचे उद्दाम वक्तव्य आहे .

आमच्या पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत त्यांनी खडे बोल सुनावले. त्यांना अहंकार खूप आहे. या उद्दामपणाला जनता निवडणुकीत उत्तर देईल. जोशींना सत्तेतून अन्य काही दिसत नाही. त्यां येथे कोणतीही शक्ती कायम नाही. काही लोकांचा अहंकार इथेच संपला. जोशींची राजकीय इतिश्रीही जवळ आली आहे. ते त्यांच्या शब्दांत दिसत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Tags: