Belagavi

शालेय मुलांसाठी फूड फेस्टिवल

Share

कित्तूर तालुक्यातील शासकीय उच्च प्राथमिक उर्दू शाळेत मुलांसाठी फूड फेस्टिव्हलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुलांना व्यवहार ज्ञान समजावे , बाजारात खरेदी विक्री कशी केली जाते , विक्रीतून नफा कसा मिळवावा या उद्देशाने , कित्तूर तालुक्यातील , शासकीय उच्च प्राथमिक उर्दू शाळेत मुलांसाठी फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते .

या फूड फेस्टिवलमध्ये मुलांनी , सामोसा , पाणी पुरी , मंचुरियन , नूडल्स , त्याचप्रमाणे विविध चटपटीत खाद्यपदार्थ , सरबते , कस्टर्ड , घरून बनवून आणले होते . शाळेच्या आवारात स्टॉल्स लावून , विद्यार्थीच विक्रेते बनून त्या पदार्थांची विक्री करीत होते . अन्य विद्यार्थी हे पदार्थ खरेदी करून तयार ताव मारत होते .

या फूड फेस्टिवलचे उदघाटन , अध्यक्ष इरशा जमादार यांनी केले . यावेळी , एसडीएमसीचे सर्व सदस्य , पालक आणि विद्यार्थी मोठया संख्येने या फूड फेस्टिव्हलमधील पदार्थांचा आस्वाद घेत होते .

Tags: