27 रोजी बेळगाव दौऱ्यावर येणाऱ्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन सर्व तयारी करत असल्याचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले.
शहरातील शहापूर येथील शिवाजी उद्यान येथे कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासन व भाजप नेते व कार्यकर्ते व जिल्ह्यातील सर्व अधिकारी अहोरात्र झटत आहेत. पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी , दहा हजार महिला भगवा फेटा बांधून तसेच पूर्णकुंभ घेऊन स्वागत करणार आहेत . त्याचबरोबर दहा हजार ध्वज लावण्यात आले आहेत .

त्याचप्रमाणे पंतप्रदान मोदी सहभागी झालेल्या कार्यक्रमातील फोटोंचे १०८ ध्वज तयार करून लावण्यात आले आहेत देशातील सर्व राज्यांची संस्कृती दर्शवणारी कलापथके देखील रॉड शो वेळी आपली कला सादर करीत सहभागी होणार आहेत . शिवाय देशातील ३० महापुरुषांच्या जीवनावर आधारित घटनांचे जिवंत देखावे देखील सादर केले जाणार आहेत . त्याचप्रमाणे मोदी सत्तेत आल्यानंतर भारतात काय काय प्रगती झाली हे लाईव्ह दाखवले जाणार आहे . त्याचप्रमाणे ३० झानान्झापथके देखील सहभागी होणार आहेत . बेळगाव दक्षिणन मधील सुमारे एक हजाराहून अधिक कार्यकर्ते या रोड शोच्या तयारीसाठी अहोरात्र जातात असल्याचे त्यांनी सांगितले .

तसेच जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी रोड शो मार्गाची पाहणी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्व प्रकारची तयारी सुरू असल्याचे सांगितले. पंतप्रधान मोदी रेल्वे प्रोजेक्ट , जलजीवन मिशन तसेच किसान सन्मान योजनेचा १३ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग करणार आहेत . मालिनी सिटीच्या मैदानावर , भव्य व्यासपीठ तसेच भव्य मंडप उभारणीचे काम जोरदार सुरु असून , उद्या संध्याकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल . ८ किमी . होणाऱ्या रोड शोसाठी बॅरिकेड्स लावण्यात आली आहेत . सर्व विभाग मिळून सहकार्य करीत आहेत . या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लाभार्थी येणार असल्याने , पाणी , ताक अशी व्यवस्था करण्यात आली आहे . त्याचप्रमाणे एसपीजी कार्यालयाकडून , रोड शोचा मार्ग निश्चित केला जाणार आहे .
एकंदर जिल्हा प्रशासबरोबरच , पोलीस खाते , त्याचप्रमाणे आ . अभय पाटील स्वतः मोदींच्या आगमनाच्या तयारीत गुंतलेले पाहायला मिळत आहेत


Recent Comments