कोल्हापूर | कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठावर मागच्या चार दिवसांपासून पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. या कार्यक्रमादरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याठिकाणी असलेल्या गोशाळेतील गायींना कार्यक्रमातील शिळे अन्न खायला घातल्याने तब्बल 50 हून अधिक गायी दगावल्या आहेत. याठिकाणी हजारो गायींची गोशाळा आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरी मठ इथला हा प्रकार आहे. अचानक घडलेल्या या प्रकाराने कणेरी मठावर खळबळ उडाली आहे. कणेरी मठावर सध्या पंचमहाभूत महामंगल सोहळा सुरू आहे. हा सोहळा सुरू असताना तब्बल 54 गाईंचा मृत्यू झाला आहे. तर 30 गायी गंभीर आहेत.

कार्यक्रमातील शिल्लक शिळे अन्न खाऊ घातल्याने मृत्यू झाल्याची इथे चर्चा आहे. गंभीर गाईंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मठावर देशी गाईंची मोठी गोशाळा आहे. गोशाळेत हजारो गायी आहेत. मठ प्रशासनाकडून लपवाछपवी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप होत आहेत.


Recent Comments