Khanapur

गंदिगवाड गावासाठी सुमारे 4 ते 6 कोटींची विकासकामे

Share

खानापूर तालुक्यातील गंदिगवाड अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांच्या स्मशान रस्त्याच्या डांबरीकरण कामकाजाचा शुभारंभ आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला .

या रस्त्याच्या कामकाजासाठी आ . डॉ . अंजली निंबाळकर यांनी भूमिपूजन केले .  यावेळी बोलताना आमदार डॉ.अंजली निंबाळकर म्हणाल्या की, गंदिगवाड गावातील जनतेची अनेक दिवसांपासून हा रस्ता तयार करण्याची मागणी आहे. रस्ता खराब असल्याने रात्रीच्या वेळी अंत्यसंस्काराला जाणे अत्यंत गैरसोयीचे होत आहे, . या रस्त्याच्या बांधकामासाठी , सुमारे ४७ लाख ६३ हजार रुपये निधीतून , या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येत आहे .

गंदिगवाड गावातील विकासकामांना मी प्रतिसाद दिला आहे. गंदिगवाड गावासाठी 6 कोटींची कामे झाली आहेत, तुम्ही सर्वानी माझा पाठीशी राहा . यावेळी काँग्रेस पक्षाचे सरकार १०० % येणार आहे . गेल्या ७० वर्षाच्या काळात आमच्या तालुक्यातील एकाही आमदाराने जे केले नाही ते या वेळी एका महिला आमदाराने केले आहे . प्रत्येक अधिवेशनात तालुक्याच्या विकासाठी आवाज उठवून एक हजार कोटींचे अनुदान आणल्याचे त्यांनी सांगितले. आपली सेवा करण्याची संधी पुन्हा एकदा द्यावी असे आवाहन त्यांनी केले .

यावेळी अनेक ग्रामस्थांनी आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुकही केले.

Tags: