Accident

धारवाडजवळ भीषण कार ट्रक, अपघातात पाच ठार

Share

महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात , कारची समोरून जाणाऱ्या ट्रकला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ५ जण जागीच ठार झाले तर चौघेजण जखमी झाले आहेत . हा अपघात धारवाडजवळ पुणे बेंगळूर गावाजवळ घडला

धारवाड तालुक्यातील टेगुर गावाजवळ हा अपघात घडला असून सर्व मृत बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अवरादी गावातील असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात कारमधील चौघे आणि पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर कारमधील एका बालकासह अन्य तिघेजण जखमी झाले आहेत . मृतांमध्ये नागाप्पा इराप्पा मुद्दोजी, महांतेश मुद्दोजी, बसवराज नरगुंद , , श्रीकुमार नरगुंद यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.

तर या अपघातात , श्रवणकुमार बसवराज नरगुंद (वय ७), मडिवाळप्पा राजू अळणावर (वय २३ ), प्रकाशगौडा शंकरगौडा पाटील (वय २२ ), मंजुनाथ महांतेश मुद्दोजी(वय २२ ) हे गंभीर जखमी झाले असून , त्यांच्यावर हुबळीतील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत .

अग्नीवर पथकामध्ये निवड झालेल्या मंजुनाथ ला हुबळीला सोडण्यासाठी हे सर्वजण कारमधून निघाले असताना हा अपघात घडला .

गरग स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Tags: