Belagavi

शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ महत्वाचे : आ. लक्ष्मी हेब्बाळकर

Share

लहान वयातच मुलांमध्ये शिक्षणाबरोबरच खेळाची आवड निर्माण केल्याने ते केवळ मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहत नाहीत तर ते सक्रियही राहतात,” असे बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

हलगा गावातील शासकीय पूर्व प्राथमिक मराठी शाळेच्या मैदानावर आयोजित शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या उदघाटन समारंभात त्या बोलत होत्या .
“कबूतर हे शांततेचे प्रतीक आहेत आणि खेळ देखील शांतपणे आयोजित केले पाहिजेत,” असे सांगून त्या म्हणाल्या कि , क्रीडा उपक्रमांमध्ये भाग घेऊन, विद्यार्थ्यांनी मजबूत राष्ट्राच्या उभारणीसाठी मजबूत मानसिक आणि शारीरिक स्थिती राखणे असणे आवश्यक आहे.

यावेळी , सदा बिळगोजी , सचिन समजी, चारुकीर्ती सायबन्नवर, महावीर बेल्लद , सुकुमार हुडेफ , शांतू बेल्लद , रूपा सुतार, संतोष के, भरतेश बेल्लद , सिद्दू कुरंगी, गणपत मारिहाळकर, महावीर पाटील, शिवाजी बिळगोजी, कृष्णा संताजी, सुरेश बिळगोजी, सी.बी. नाईककर, अन्वर लंगुटी, रामू मोरे, यू.एन. हिरेमठ, प्रकाश पाटील, एसडीएमसी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व संबंधित शाळेचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: