माध्यम अकादमी पुरस्कार मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातील तीन पत्रकारांचा बेळगाव जिल्हा कार्यरत पत्रकार संघातर्फे सत्कार करण्यात आला.
माध्यम अकादमी पुरस्कार प्राप्त कर्नाटक कार्यकारिणी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप कुरुंदवाडे , सचिव श्रीकांत कुबकट्टी व सदस्य चन्नाप्पा मादार यांचा सत्कार सदस्यांनी केला.
कर्नाटक श्रमजीवी पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष पुंडलीक बालोजी , जिल्हा उपाध्यक्ष राजशेखर पाटील, सरचिटणीस अरुण पाटील, कार्यकारिणी सदस्य मंजुनाथ पाटील, श्रीशैल मठद , नौशाद विजापुरे, मल्लिकार्जुन गोंडी, व विविध तालुका सदस्य उपस्थित होते.


Recent Comments