Chikkodi

चिकोडी नगरपालिकेचा 9.13 लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प सादर

Share

चिक्कोडी नगरपालिकेचा सन 2023 व 2024 चा 9.13 लाख रुपयांचा बचतीचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी मांडला.

चिकोडी नगरपालिका सभागृहात झालेल्या पालिका अंदाजपत्रक सादरीकरण सभेत नगराध्यक्षांनी पालिकेच्या सन 2023-2024 साठी 20.14 कोटींच्या उत्पन्न असल्याचे सांगून , 20.05 कोटी खर्च अपेक्षित धरला आहे. त्यांनी एकूण 9.13 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला
नगराध्यक्ष प्रवीण कांबळे म्हणाले कि , चिक्कोडी शहराच्या सर्वांगीण विकासावर अधिक भर देण्याबरोबरच केंद्र व राज्य शासनाकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.

उपाध्यक्ष संजय कवटगीमठ म्हणाले की, शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी शासनाकडून अधिकाधिक अनुदान घेऊन विकासाभिमुख कार्यक्रम राबविले जातील.
कर्नाटक सौहार्द सहकारी महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश कवठगीमठ, स्थायी समिती अध्यक्ष आदम गणेशवाडी, रामा माने, अनिल माने, नागराज मेदर, संतोष जोगुले, साबिर जमादार, गुलाबहुसेन भगवान, तमाजी कदम, शांबवी अश्वथपुरे, शकुंतला दोनवडे , अश्वनाथ मिरवडे, आदी उपस्थित होते. उपस्थित.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सुंदर रोगी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

Tags: