Vijayapura

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी बोट कलंडली

Share

विजापूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील बबलादी जवळील कृष्णा नदीत प्रवाशांना खचाखच भरून घेऊन जाणारी बोट उलटली.

बबलादी सदाशिव मठात आलेले बागलकोट जिल्ह्यातील भाविक बोटीच्या साहाय्याने कृष्णा नदी पार करत होते. यावेळी क्षमतेपेक्षा जास्त भाविक बोटीमध्ये चढले त्यामुळे बोट कृष्णा नदीत उलटली. बबलादीच्या सदाशिव मठाची जत्रा उरकून भाविक बबलादी ते मुंडगनूर दरम्यानच्या कृष्णा नदीतुन नावेतून आपल्या गावी जात असताना हा अपघात घडला झाला.

बोटीच्या काठावर बसलेल्या लोकांनी बोट कलंडत असताना , नदीत उड्या मारल्या . जवळच किनारा असल्याने नदीत पडलेल्यांनी पोहत किनारा गाठला . . ही घटना बबलेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

Tags: