Kagawad

शेडबाळ मधील पुरातन श्री बसवण्णा मंदिरात जत्रा महोत्सव

Share

कागवाड तालुक्यातील शेडबाळ शहरात १२व्या शतकात बांधलेल्या प्राचीन श्री. बसवण्णा मंदिराच्या जत्रा महोत्सवाचा कार्यक्रम विविध कार्यक्रमांनी आयोजित केला जातो. 18 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या या जत्रा महोत्सवाची सांगता २८ फेब्रुवारीला होणार आहे … जत्रेदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे .

श्री बसवण्णा देवाच्या जत्रा महोत्सवानिमित्त शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता रथोत्सव होणार आहे . हाताने रथ ओढण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्या दिवशी समाजातील सर्व सदस्य एकत्र येऊन हाताने रथ ओढून जत्रा साजरा करतात.

शेडबाळच्या प्राचीन बसवण्णा मंदिरात त्रिकाल नंदी आहेत . सकाळ संध्याकाळ आरती व इतर पारंपारिक धार्मिक कार्यक्रम दररोज केले जात आहेत. शिवरात्रीपासून जत्रा सुरू होते. जत्रेनिमित्त गुरुवारी दुपारी ४:३० वाजता मंदिर परिसरात महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवारी 24 फेब्रुवारी रोजी रोजी श्री बसवण्णांचा पालखी महोत्सव , महोत्सव सायंकाळी, रथोत्सव रात्री मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे.
तर शनिवारी 25 फेब्रुवारी रोजी रात्री विनोदी रास संध्या, आणि रविवारी 26 फेब्रुवारी रोजी रात्री मुडलगी लोककला तज्ञ शब्बीर डांगे व त्यांच्या टीमचा चिलीपिली जनपद रसमंजरी कार्यक्रम होणार आहे.

पुरुषांच्या खाण्याच्या स्पर्धा, सायकल स्पर्धा, व अन्य स्पर्धा होणार आहेत. तसेच सोमवारी 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी स्पर्धांचे आयोजन केले आहे.
अशी माहिती जत्रा समितीचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली .

सायंकाळी श्री बसवेश्वर मंदिरात मंदिराचे पुजारी कुमार गुरूजी यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला. नंतर श्री बसवण्णांच्या मूर्ती घेऊन भव्य पालखी मिरवणूक निघाली.

जत्रा कमिटीचे अध्यक्ष सुनील पाटील, विनोद पाटील, वर्धमान पाटील, अश्वत पाटील, अशोक विभूती , शुभम पाटील, रोहिदास मुजावर यांच्यासह सर्व समिती सदस्य जत्रा यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Tags: