चिक्कोडी येथील प्रतिष्ठित सीटीई संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त आर.डी.हायस्कूलमध्ये 10,000 मुलांना रोपांचे वाटप करून वनोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे संस्थेचे संचालक संजय आडके यांनी सांगितले.

आरडी महिला महाविद्यालयाच्या सभा भवनात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, चिक्कोडी तालुका शैक्षणिक संस्था आरडी हायस्कूलच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे वर्षभर सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करून शताब्दी सार्थक साजरी केली जाईल, असे ते म्हणाले.
शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी रोजी , रोजी सीटीई संस्था आणि कर्नाटक वनविभागाच्या कंपाऊंडमध्ये 10 हजार रोपांचे रोपण व वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. चिंचणी अल्लमप्रभू स्वामीजी, चिक्कोडी चरमूर्ती मठाचे संपादन स्वामीजी दिव्य सानिध्य करतील. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सी.बी.कुलकर्णी, अथणी जे ई संस्थेचे संचालक अरविंदराव देशपांडे, उपविभागीय अधिकारी माधव गित्ते उपस्थित राहणार आहेत. विशेष निमंत्रित म्हणून डीडीपीआय मोहनकुमार हंचयते, सहायक वनाधिकारी श्रीमती सुनीता निंबरगी, डीवायएसपी बसवराज यलीगार , सहायक कृषी संचालक मंजुनाथ जनमट्टी, विभागीय वन अधिकारी प्रशांत गुराणी, शताब्दी उत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी संस्थेचे संचालक वकील सतीश कुलकर्णी, अरुण कुलकर्णी, प्रशासक मिथुन देशपांडे आदी उपस्थित होते.


Recent Comments