Belagavi

गाणीग विकास महामंडळ स्थापनेचा सरकारचा आदेश

Share

गाणीग समाजाची, गाणीग विकास महामंडळ स्थापनेची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होत आहे . राज्य सरकारने अधिकृत आदेश जारी केल्याचे बेळगाव जिल्हा गाणीग संघटनेचे अध्यक्ष रमेश उटगी यांनी सांगितले .

शहरातील कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, आपला समाज मागासलेला आहे, या महामंडळाची स्थापना केल्याने आपला समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती करू शकतो. महामंडळ स्थापन केल्याने आपल्या समाजातील मुलांना सर्व समाजाप्रमाणे शिक्षणात उच्च दर्जा मिळण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.आम्ही सर्वजण शासनाचे आभारी आहोत.

गाणीग विकास महामंडळ स्थापन करण्याचा आदेश सरकारने दिल्याने , समाजाच्या सर्व नेत्यांनी व तालुकाध्यक्षांनी शहरातील कित्तूर चन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई याना धन्यवाद दिले . चन्नम्मा सर्कलमध्ये फटाके फोडून विजयोत्सव साजरा करून मिठाई वाटप केले .

यावेळी महिला संघटनेच्या अध्यक्षा प्रा शोभा गाणगेर , गंगाधरामद्दीमनी, प्रकाश बाळेकुंद्री, एस.एम. कलठी, राजीव गाणीग, आदिअप्पा कोटी, कल्लाप्पा गाणगेर, चन्नाप्पा गाणगेर , शकुंतला तेली , बसवराज तेली आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

Tags: