Belagavi

मनव्वा चेन्नप्पा गुरलहोसुर यांचे मरणोत्तर देहदान

Share

सवदत्ती तालुक्यातील मुनवल्ली शहरातील , गांधीनगर येथिल मनव्वा चेन्नप्पा गुरलहोसुर (४५) या अविवाहित महिलेचे मरणोत्तर देहदान तसेच नेत्रदान आणि त्वचादान करण्यात आले .

मनव्वा चेन्नप्पा गुरल होसुर (४५) यांचे राहत्या घरी निधन झाले. मृताच्या शेवटच्या इच्छेनुसार बैलहोंगल येथील रामण्णा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बेळगाव के.एल.ई. विद्यापीठाच्या श्री बी एम के आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाला देहदान करण्यात आले . त्याचप्रमाणे , बेळगाव केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाच्या नेत्र पेढीला नेत्रदान , तसेच केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या , केएलई रोटरी स्किन बँकेला त्वचादान करण्यात आले .

Tags: