श्री शिवलिंगेश्वर मंदिराच्या महाप्रसादाच्या निमित्ताने आपण सर्वजण या उत्सवात जात-पात, धर्म भेद न करता सहभागी झालो आहोत.या देशाची अखंडता अबाधित राखण्यास मदत करू.असे माजी आ . फिरोज सेठ म्हणाले .
बेळगाव तालुक्यातील आलारवाड येथील श्री गणेशनगर आश्रय वसाहतीत श्री शिवलिंगेश्वर मंदिराच्या महाप्रसाद आणि जत्रा महोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते . मंदिराच्या प्रांगणात भगवा ध्वजा फडकावून पत्रकारांशी बोलताना माजी आमदार फिरोज सेठ म्हणाले, येथे सर्व जातीधर्माचे लोक आहेत. श्री शिवलिंगेश्वर मंदिराच्या महाप्रसादाच्या निमित्ताने आपण सर्वजण या उत्सवात जात-पात, धर्म भेद न करता सहभागी झालो आहोत.या देशाची अखंडता अबाधित राखण्यास मदत करू.

गणेश नगर आश्रय कॉलनी येथे , श्री शिवलिंगेश्वर मंदिर महाप्रसाद उत्सव महाप्रसाद व जत्रा महोत्सवाचे आयोजन सात वर्षांपासून करण्यात येत आहे.विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जत्रा महोत्सवानिमित्त कलश मिरवणूक काढण्यात आली . यामध्ये मोठ्या प्रमाणवा रमशील सहभागी झाल्या होत्या .
यावेळी बेळगाव शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू सेठ , नगरसेवक बसवराज मोदगेकर , केपीसीसी सदस्य परशुराम वग्गनावर, सरकारी कर्मचारी संघटनेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष बसवराज रायगोळ , सुधीर गडदे , दलित नेते सिद्धराय मेत्री प्रकाश दोड्डमणी, पांडुरंग पट्टर, बसवराज तलवार, शिवकुमार अभिगेरे, वसंत झरी, आनंद कांबळेआणि इतर उपस्थित होते .


Recent Comments