आगामी विधानसभा निवडणुकीत गोकाक मधून काँग्रेसच्या तिकीटासाठी इच्छुक असल्याचे चंद्रशेखर कोण्णूर यांनी सांगितले.
शहरात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी गोकाक काँग्रेसचे उमेदवार म्हणून यापूर्वीच अर्ज केल्याचे सांगितले. मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. विद्यार्थी जीवनापासून मी समाजासाठी लढत आलो आहे. तसेच, राजकीय जीवनात तालुका पंचायत सदस्य म्हणून काम केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे तिकीट देण्यासाठी मी केपीसीसी अध्यक्ष डीके शिवकुमार, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह विविध काँग्रेस मान्यवरांची भेट घेतली आहे.
माझ्या तिकिटाबद्दल काँग्रेस पक्ष जो काही निर्णय घेईल त्याला मी बांधील आहे. प्रकाश बागोजी, अशोक पुजारी, महांतेश कडाडी आणि मी गोकाक काँग्रेसचे तिकीट इच्छुक आहोत. अशोक पुजारी यांनी चार वेळा निवडणूक लढवली आहे. यावेळी नव्या चेहऱ्याला परवानगी द्यावी, गोकाकवासीयांची संपर्क बैठक घेऊन याकडे पक्षाचे लक्ष वेधले असल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदर गोकाक मतदारसंघातून काँग्रेसचं उमेदवार म्हणून आपण निवडणूक लढाऊ इच्छितो असे चंद्रशेखर कोण्णूर यांनी सांगितले .


Recent Comments