Banglore

खानापूर मतदारसंघाच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष

Share

खानापूरच्या आमदार डॉ . अंजली निंबाळकर यांनी , सदनामध्ये जलसंपदा मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात पावसाळयात खराब झालेले रस्ते , पूल दुरुस्ती , तसेच बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी सरकारकडून अनुदान दिले गेले नसल्याने प्रश्न केला . सरकार अनुदान न देता खानापूर मतदार संघावर अन्याय करीत आहे . याचे उत्तर त्यांनी मागितले .

खानापुरच्या आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी त्यांच्या मतदारसंघातुन वाहणारी मलप्रभा नदी कणकुंबी येथे उगम पावून सवदत्तीजवळील रेणुका सागर धरणातून कुडल संगमला जाऊन मिळते. पावसाळ्यात येणाऱ्या पुरांमुळे या भागातील रस्ते आणि पुलांची दुर्दशा होते . यावेळी त्यांनी आपल्या मतदारसंघातील प्रामुळे खराब रस्ते आणि पुलांबद्दल माहिती देऊन , त्याच्या दुरुस्तीसाठी , सरकारने गेल्या चार वर्षात एक रुपयाही दिला नसल्याबद्दल आ . अंजली निंबाळकर यांनी संताप व्यक्त केला .

याला उत्तर देण्यासाठी जलसंपदा मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले की, मलप्रभा धरण 1962 मध्ये बांधण्यात आले होते, आणि ते बांधल्यानंतर ते 2019 पर्यंत पाच वेळा भरले होते, रस्त्यांचे वेगवेगळे मालक आहेत, आरडीपीआर आहेत, सार्वजनिक सुविधा आहेत, कुठे खराब आणि अस्वच्छ रस्ते आहेत तसेच मलप्रभा नदीवरील अतिक्रमणाबाबत ते गांभीर्याने घेतील, असे ते म्हणाले.

यावर आमदार डॉ.अंजली निंबाळकर म्हणाल्या की, जलसंपदा या नात्याने हे काम आपल्या अखत्यारीत नाही, तर रस्ते, पूल या लघु पाटबंधारे,खात्याशी संबंधित आहेत, त्यांना आमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे आणि त्यांचा रोष जनतेवर असल्याचे सांगितले. खानापूरला दोन वर्ष महापूर आला मात्र सरकारने आमच्या लोकांवर अन्याय केला आहे, रस्त्यांसाठी एक रुपयाही देण्यात आलेला नाही. असा आरोप आ . अंजली निंबाळकर यांनी केला .

Tags: