Belagavi

कडोली गावात शिवजयंती साजरी

Share

कडोली गावात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवाजी चौकातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ, शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

जेष्ठ नागरिक व माजी ग्रा.पं.अध्यक्ष अण्णु कटांबले व कडोली कुस्ती सं.अध्यक्ष वसंत पावले यांनी नारळ वाढवून शिव छत्रपतींची विशेष पूजा केली . यशोधन मंगल कार्यालयाचे अध्यक्ष ओ.के.चौगुले व ह.भ.प.गंगाराम लाड यांनी शिव पुतळ्याची पूजा केली . ग्रा.पं.अध्यक्षा व सदस्यांनी पाळणा पूजा करुन पाळणा गित गायले,

नंतर कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या खानापूरच्या स्वाती पाटील शिवरायांच्या इतिहासाबदल उपस्थितांना माहिती दिली . (फ्लो )
श्री कल्मेशवर भजनी मंडळाने भजन सेवा केली तर अण्णु कटांबले शिवरायांचे गित गायले . तर .

यावेळी जेष्ठ व सह्याद्री को.आ.सोसायटी कडोली शाखेचे अध्यक्ष के.टी.उच्चुकर,जेष्ट व माजी मुख्याध्यापक बसवंत कुट्रे मास्तर,बाबुराव बाळेकुंद्रीसह माजी सैनिक कल्याण संघाचे पदाधिकारी,ग्रा.पं.अध्यक्षा रेखा सुतार,उपाध्यक्ष रेखा नरोटी,माजी ग्रा.पं.अध्यक्ष राजु मायाण्णा,माजी ग्रा.पं. अध्यक्ष दत्ता सुतार,माजी ग्रा.पं.उपाध्यक्षा प्रेमा नरोटी,ग्रा.पं.सदस्य राजु कुट्रे, शिवप्रेमी,श्री कल्मेश्वर भजनी मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Tags: