Haveri

भारताची संस्कृती , परंपरा तसेच धर्माचे रक्षण करणारे शिवाजी महाराज यांचा आम्हाला अभिमान आहे: मुख्यमंत्री बोम्मई

Share

परकीय आक्रमणाविरुद्ध लढा देऊन , गुलामगिरीतून मुक्त करणारे , भारताची संस्कृती , परंपरा तसेच धर्माचे रक्षण करणारे शिवाजी महाराज यांचा आम्हाला अभिमान आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले .

मुख्यमंत्री बोम्मई यांनी हावेरी जिल्ह्यातील शिग्गाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन , शिवरायांचे गुणगान केले . ते म्हणाले कि , शिवाजी महाराजांनी लहान वयातच स्वराज्याची शपथ घेतली . त्यांची आई जिजाबाई यांनी त्यांच्यावर , अन्यायाविरोधात लढा देण्याचे संस्कार लहानपणापासूनच केले होते .

तर बंडोजी पंतांनी त्यांना शस्त्रविद्येत पारंगत केले . दरी , स्थैर्य , आणि आत्मबल मिळून, शिवाजी महाराजांनी आपल्या युद्ध कलेने , वेगवेगळे प्रांत , मुघलांच्या ताब्यातून परत मिळवले . हिंदू धर्म आणि राज्यावरील आक्रमणे त्यांनी परतवून लावली . छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य अपूर्व असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले . सर्व जाती ,पंथ ,भाषा याना समान वागणूक दिली . आम्ही देखील त्याचप्रमाणे सर्वाना समान वागणूक देत आहोत .


बजेटमध्ये जाहीर केल्याप्रमाणे सर्व आश्वासनांची पूर्तता करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांची सांगितले . यावेळी मुखमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण केले .

Tags: