बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने , छत्रपती शिवाजी उद्यानात शिवजयंती साजरी करण्यात आली . शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली .
जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड आणि सांस्कृतिक विभाग आणि महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महापौर शोभा सोमनाचे यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्यानंतर शिवजयंतीच्या रथ मिरवणुकीचा शुभारंभ करण्यात आला .

शहरातील श्री छत्रपती शिवाजी उद्यानापासून निघालेली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक , शहापूर खडेबाजार ते नाथ पै सर्कल मार्गे नेऊन, पुन्हा मार्गक्रमण करत अखेर शिवाजी उद्यानात पोहोचली.

यावेळी खासदार मंगला अंगडी, आमदार अभय पाटील, महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, आणि कन्नड व सांस्कृतिक विभागाच्या उपसंचालक विद्यावती भजंत्री, त्याचप्रमाणे नगरसेवक आणि पोलीस अधिकारी यांच्यासह अनेकांनी छत्रपतींना अभिवादन केले .


Recent Comments