Belagavi

राजहंसगडावरील शिवरायांच्या मूर्तीसाठी भाजप सरकारनेच दिला निधी

Share

आमदार म्हणून निवडून आल्यांनतर २०१३ ते २०१८ च्या कालावधीत राजहंसगडच्या विकासासाठी ७५ लाख रुपये मंजूर असताना , काँग्रेसचे सरकार असताना एकही पैसा का रिलीज केला नाही असा प्रश्न माजी आमदार तसेच , भाजप बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी केला .

बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील , येळ्ळूर येथील राजहंसगडावर , माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासोबत विकास कामांची पाहणी केल्यावर , माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते . २०१८ रोजी झालेल्या निवडणुकीत लक्ष्मी हेब्बाळकर आमदार झाल्या आणि त्यांनी २०१९ रोजी पुन्हा या पुतळ्याच्या कामासाठी भूमिपूजन केले . त्यावेळी भाजपच्या मंत्र्यांनी काय करायचे असा प्रश्न केला . त्यावर आपण शिवरायांना आम्ही दैवत मानतो , हिंदुत्व ही आमची विचारधारा आहे , त्याच्या आड यायचे नाही , ते काम करायचेच असे सांगितले .

आ . लक्ष्मी हेब्बाळकर स्वतःला राणी चन्नम्मा समजतात . त्यांनी आतापर्यंत एक तरी काम राणी चन्नम्मा किंवा संगोळी रायणांचे एक तरी काम केले आहे का ? कुठल्या मंदिराला काय दिले आहे का ? यावेळी संजय पाटील यांनी आपल्या कार्यकाळातील केलेल्या विकास कामांचा दाखला दिला . सर्व समाजाला , सर्व धर्माना सोबत घेऊन जाण्याचे काम आपण केले . पण लक्ष्मी हेब्बाळकर निवडणुकीचे साधन म्हणून मराठी लोकांना फसवण्याचे काम करीत आहेत .

त्यांचे शिवरायांवर प्रेम अजिबात नाही आणि असते तर २०१३ ते २०१८ या काळात फंड रिलीज केला असता . आणि आतासुद्धा या पुतळ्यासाठी आमच्या भाजपचे कन्नड आणि सांस्कृतिक मंत्री सुनीलकुमार यांनी निधी मंजूर केला आहे . २०१९ सालात सी टी रवी पर्यटन मंत्री असताना साडेतीन कोटी रुपये मंजूर केले आहेत . आणि आतासुद्धा आमचा या शिवरायांच्या कामाला विरोध नाही , हे काम व्हायला हवे , फक्त शिष्टाचार पाळा , ज्या काँग्रेसच्या पंडित नेहरूंनी शिवरायांना चोर , लुटेरे म्हणून संबोधले , हिंदू शब्द अश्लील म्हणणारे , गोमांस खाऊन मंदिरात गेलेले चालते असे म्हणणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनी शिवरायांच्या मूर्तीचे अनावरण करायचे हे आम्हाला पटत नाही . त्यामुळे सरकारी प्रोटोकॉल पाळा असे ते म्हणाले .

यावर माध्यमांनी चन्नराज हट्टीहोळी यांनी शिष्टाचाराचे उल्लंघन होत नाहीय , पुतळा अनावरणाच्या पत्रिका अजून छापलेल्या नाहीत असे सांगितले आहे मग शिष्टाचाराचे उल्लंघन कसे काय होत पुतळा अनावरणा संबंधीच्या बातम्या तुम्ही खोट्या देता काय , तुम्ही खोटे बोलता काय असा प्रतिप्रश्न केला . यावेळी त्यानी आपण ही बातमी असलेली मराठी आणि कन्नड वर्तमानपत्रे सोबत आणायचे दाखवले .

एकंदर राजहंसगडावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासाठी आणि किल्ला विकासासाठी भाजप सरकारनेच अनुदान मंजूर केले असल्याचे माजी आ . संजय पाटील यांनी सांगितले .

Tags: