दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारवाडमधील सोमेश्वराच्या दर्शनासाठी आज भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. पहाटे तीन वाजल्यापासून मंदिरात अभिषेक व पूजा कार्य पार पडले. त्यानंतर भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात आली. दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त सोमेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी असते.
शाल्मला नदीच्या काठी असलेले हे सोमेश्वराचे मंदिर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असून गर्भगृहापासून महाद्वारापर्यंत भाविक दर्शनासाठी रांगा लावतात. या मंदिरात आज दिवसभर भाविकांची गर्दी असणार आहे. आज उपवास असल्याने अनेक लोक मंदिर परिसरात भाविकांना फळे वाटप करत आहेत. आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांना गर्भगृहात प्रवेश दिला जात असल्याने सर्व भाविक सोमेश्वराला बिल्वपत्र आणि फुले अर्पण करत आहेत.


Recent Comments