दोन वर्ष कोवीडमुळे महाशिवरात्री साजरी केली गेली नाही मात्र यंदा मोठया उत्साहात महाशिवरात्री साजरी केली जात असल्याचे , केएलई हॉस्पिटलचे संचालक कर्नल दयानंद यांनी सांगितले .
के एल इ संस्थेच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणातील , शिवालयामध्ये , महाशिवरात्री मोठ्या धार्मिकतेने आणि उत्साहात साजरी केली जात आहे . हजारो भक्तांनी अगदी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी रन्ग लावल्या आहेत . यासंबंधी माहिती देताना केएलई संस्थेचे संचालक कर्नल दयानंद यांनी सांगितले कि,के एल इ संस्थेकडून , महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे . या शिवालयात हजारो भक्तांनी सकाळपासून भेट देऊन दर्शन घेतले आहे . ४० ते ५० हजार लोक मंदिराला भेट देतील अशी अपेक्षा आहे . संगीत तसेच भजनाचा कार्यक्रम होणार आहे . दोन वर्ष कोविडमुळे मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला गेला नव्हता . मात्र यंदा खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे .
शिवालयाचे पुजारी शंकरय्यास्वामी हिरेमठ यांनी सांगितले की ,दरवर्षीप्रमाणे यंदादेखील के एल इ संस्थेच्या प्रांगणातील शिवालयामध्ये के एल इ प्रशासन मंडळाकडून , महाशिवरात्रीचा उत्सव , मोठ्या भक्तिभावाने केला जात आहे . सकाळी महारुद्राभिषेक , त्याचप्रमाणे , विविध फळाची आरास करून नैवेद्य दाखवण्यात आला . यंदा अमरनाथ शिवलिंगाची बर्फापासून तयार केलेली प्रतिकृती भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे . संध्याकाळी भजन कार्यक्रम होणार आहे . त्याचप्रमाणे , के एल इ प्रशासनाकडून , शिवालयात येणाऱ्या सर्व भक्तांसाठी सर्व प्रकारची सोय करण्यात आली आहे . भक्तानी महाशिवरात्रीनिमित्त शिवलिंगाचे दर्शन घेऊन ,शिवशंभोची कृपा प्राप्त करावी असे ते म्हणाले .
के एल इ च्या शिवालयामध्ये , शिवभक्तांची मोठी गर्दी होती .


Recent Comments