बेळगाव तालुक्याच्या सीमाभागातील शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या आणि कडोली गावातील अत्यंत जागृत, पुरातन आणि , भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा आणि पंचक्रोशीतील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान व तिर्थस्थळ असलेल्या श्री दुरदुंडेश्वर विरक्त मठाचा सालाबादाप्रमाणे यंदा महाशिवरात्रीला जत्रा महोत्सव होणार आहे .
शनिवार दि.१८/०२/२३ रोजी सकाळी ८ .०० वा. षटस्थल ध्वजारोहण झाल्यानंतर , सकाळी दहा वा.विजया हॉस्पिटलतर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे . संध्याकाळी ६.००वा.मुलांचे सांस्कृतिक व प्रतिभा पुरस्कार कार्यक्रम होणार असुन जगदगुरु डा.तोंटद सिद्धराम स्वामीजी, महंत स्वामीजी शिगुनशी मठ,तसेच चिक्कोडी क्षेत्राचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्यासह विविध नेते व लोकप्रतिनिधि,विविध अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याच दिवशी रात्री ९.०० वा.कडोली, नागनुर ,अगसगा,मण्णिकेरी,दुरदुंडि,देवगिरी,गुंजेनट्टी आणि शिवापुर ग्रामस्थांच्या भजनी मंडळातर्फे शिवयोग जागर भजन होणार आहे .
रविवारी दि.१९/०२/२३ रोजी सकाळी ६.०० वा.श्री दुरदुंडेश्वर मुर्तिला महारुद्राभिषेक,नंतर सकाळी १०. वा.सवाद्य पालखी मिरवणूक नंतर सकाळी ११.०० वा. सिमा अभिवृद्धी प्राधिकार,बेंगळु्र,अखिल कर्नाटक हितरक्षण संघ(र ) मार्फत कविगोष्टी कार्यक्रम होणार आहे . दुपारी २.०० वा.महाप्रसाद , नंतर संध्याकाळी ६.३० वा.विविध साधक,दानशुर मान्यवरांचा सन्मान समारंभ होणार असुन अरभावि दुरदुंडेश्वर मठाचे श्री सिद्धलिंग स्वामिजींचे सानिध्य तर कारंजीमठ बेळगावचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी अध्यक्ष स्थानी तर कलमठ कित्तुरचे श्री मडवाळ स्वामींच्या उपस्थित राहणार आहेत . प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष व आमदार सतिश जारकिहोळी, माजी खासदार व डीसीसी बॅंकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी,विविध अधिकारी साधक व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त सिमा विकास प्राधिकार बेंगळुर , अखिल कर्नाटक वितरक कलाहितरक्षण यांच्यातर्फे रात्री ८.३० वा. नाटक सादर होणार आहे तरी या शिवरात्री जत्रामहोत्सवामध्ये भाग घेऊन सर्व कार्यक्रमाचा लाभ घेऊन पावन होण्याचे आवाहन मठाधिश श्री गुरुबसवलिंग स्वामीजीसह भक्तांनी केला आहे.
महाशिवरात्रीच्या शुभदिनीच जत्रा महोत्सव होणे हे विशेष तर असतेच शिवाय संपुर्ण कर्नाटक व महाराष्ट् राज्यात मठाची विशिष्ट परंपरा असुन मराठी व कन्नड संस्कृतीचे माहेर घर असुन सर्वधर्मसमभाव बसव तत्व आचरण, धार्मिक कार्याबरोबर,शैक्षणिक क्रांति व धर्म व संस्कृतीचे जागृति, प्रसार व समाजसेवा करण्याचे येथील श्रींचे कार्य स्तुत्य आहे .


Recent Comments