Belagavi

भाऊराव काकतकर महाविद्यालयात फूड फेस्टिवल

Share

विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहाराबरोबरच , नफा तोटा याचे ज्ञान व्हावे तसेच , त्यांच्यामध्ये विक्रीकौशल्य निर्माण व्हावे या उद्देशाने , महाविद्यालयात फूड फेस्टिवल आणि विक्री चे आयोजन केल्याचे , भाऊराव काकतकर पदवी महाविद्यालयाच्या, इंग्रजी विषयाच्या विभाग प्रमुख प्रा . अनिता पाटील यांनी सांगितले .

बेळगावमधील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या , भाऊराव काकतकर पदवी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनींसाठी वर्किंग वुमेन्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने , फूड फेस्टिवल आणि विक्री चे आयोजन करण्यात आले होते . याची माहिती देताना ,प्रा . अनिता पाटील म्हणाल्या कि , आम्ही दरवर्षी फूड फेस्टिवल आयोजित करतो . विद्यार्थी आपल्या घरूनच वेगवेगळे पदार्थ बनवून आणतात . आम्ही त्या पदार्थांची विक्री करण्यासाठी परवानगी देतो . विद्यार्थ्यांनी गटागटाने स्टॉल्स लावले असून , शेवपुरी , पाणीपुरी , पराठा , मोमोस , मोदक आणि अन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवले आहेत .

तर कन्नड विभागाच्या प्राध्यापिका जयश्री मुगळी यांनी सांगितले कि, दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना व्यवहारज्ञान समजण्यासाठी या फूड फेस्टिवलचे आयोजन करतो . विक्रीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार , नफा याचे ज्ञान होण्याच्या दृष्टिकोनातून याचे आयोजन केले जाते . विद्यार्थी विद्यार्थिनी अतिशय उत्तम आणि चटपटीत तसेच आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक असे पदार्थ बनवून आणले आहेत . असे सांगितले .

सर्वोत्कृष्ट आणि आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण अशा पदार्थाची निवड करून , ते बनवून आणणाऱ्या गटाला पारितोषिके देण्यात आली .

एरवी हॉटेल अथवा फूड स्टॉलवर जाऊन , चटपटीत आणि स्वादिष्ट पदार्थांवर ताव मारणाऱ्या विद्यार्थ्यांना , बी के कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या या फुडफेस्टिव्हलमुळे , सकाळी सकाळीच चटपटीत पदार्थ चाखायला मिळाले .

एकंदरीत भाऊराव काकतकर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या फूड फेस्टिवलला , खूपच चांगला प्रतिसाद मिळाला .

Tags: