Belagavi

आ .रमेश जारकीहोळी यांनी आ . लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर साधला निशाणा

Share

राजहंसगडावर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शिवरायांच्या मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्र्यांसह आपणही उपस्थित राहणार आहोत , तत्पूर्वी आपण राजहंसगडाला भेट देणार असल्याचे माजी मंत्री तसेच गोकाकचें आ . रमेश जारकीहोळी यांनी सांगितले .

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे रमेश जारकीहोळी समर्थकांचा मेळावा पार पडला . या मेळाव्याच्या व्यासपीठावरून बोलताना , आ . रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव ग्रामीण च्या आमदारांना पुन्हा लक्ष्य केले . राजहंसगडावर उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या भव्य मूर्तीच्या लोकार्पण सोहळ्याची , काँग्रेस पक्षाने भली मोठी पाहुण्यांची यादी तयार केली आहे . मात्र अद्याप मुख्यमंत्री , जिल्हा पालकमंत्री , खासदार जिवंत आहेत . या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत आपणही जाणार असल्याचे त्यांनी सांगितले . मात्र त्याआधी , राजहंसगडाला ते भेट देणार असल्याचे म्हणाले . लोकार्पण सोहळा हा एक सरकारी कार्यक्रम असला पाहिजे आणि या कार्यक्रमात चुका झाल्या तर ती ग्रामीण आमदारांची जबाबदारी असेल असेही ते म्हणाले .

बागेवाडी भागात झालेल्या सुधारणांमुळे कंत्राटदार गब्बर झाले आणि पुढे त्यांनाच निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून निवडण्यात आले असा टोला लगावत , हिरेबागेवाडी येथे झालेल्या विकास कामात , मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला . पंचायतीची निधी मंजूर आला तर आमदारांना निधी मंजूर झाल्यासारखे त्या वागतात . गावपातळीवर घडणाऱ्या गोष्टी , देशपातळीवर नेण्यात येत आहेत . काँग्रेस खालच्या पातळीवरील राजकारण करीत असल्याचा खेद त्यांनी व्यक्त केला . बेळगाव ग्रामीण क्षेत्र आपणंच तयार केले आहे . मात्र सध्याच्या आमदार आपणच या भागच विकास केल्याचा आव आणत आहेत . भाजप सरकारनेच या भागाच्या विकासासाठी निधी मंजूर केला . या सर्व गोष्टी येत्या दोन महिन्यात स्पष्ट होतील. असेही ते म्हणाले .

त्याचप्रमाणे विधानसभेत आ . लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याशी झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार करून राणी कित्तूर चन्नमा यांच्या संदर्भात माझी ऑडिओ क्लिप जोडून , नाहक बदनामी करण्यात आली . मी कित्तूर चीननं यांचा कोणताही अवमान केला नाही . निवडणूक जवळ आल्या कि, आ . हॅब्ब्लकर आणि डी के शिवकुमार यानाच्याकडून असे कृत्य केले जाऊ शकते असेही रमेश जारकीहोळी म्हणाले .

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटवस्तू देऊन मतदारांनाया आकर्षित केले जात आहे . ग्रामीण आमदार मतदाराने जे देतील त्याच्या दुप्पट आपण देण्यास तयार असल्याचे माजी मंत्री, आ .रमेश जारकीहोळी यांनी सांगितले .

Tags: