खानापुर तालुक्यातील असोगा गावातील उसाच्या मळ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे दोनशे टन उसाचे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शॉर्ट सर्किटमुळे उसावर ठिणगी पडली. उसाला लागलेल्या आगीमुळे नागो सुळकर, राजाराम सुळकर, जयवंत सुळकर, श्यामराव पाटील, वामन सुळकर, मधुकर सुळकर या शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कृषी विभागाच्या अधिकार्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. खानापूर तहसीलदारांनी तात्काळ चौकशी करून योग्य ती नुकसान भरपाई द्यावी.


Recent Comments