Hukkeri

कित्तूर कर्नाटकच्या विकासासाठी राज्य सरकारने विशेष अनुदान द्यावे – चंद्रशेखर स्वामीजी

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे कर्नाटक राज्याचा कारभार प्रामाणिकपणे हाताळत आहेत. नावीन्यपूर्ण स्वरूपात अनेक विकासात्मक योगदान राज्याला समर्पित करण्यात आले आहे. त्यांची कार्य क्षमता वाखाणण्याजोगी आहे मात्र १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कित्तूर कर्नाटक भागाला विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी केली.

आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उत्तर कर्नाटकला कित्तूर कर्नाटक घोषित करण्याबरोबरच या प्रदेशात काही शांततापूर्ण विकास कामे केली आहेत. परंतु कित्तूर कर्नाटकच्या परिपूर्ण विकासासाठी बोम्मई सरकारला अनेक वर्षांपासून रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा लागणार आहे.

तसेच येत्या अर्थसंकल्पात कित्तूर कर्नाटकच्या सर्वांगीण विकासासाठी जुन्या प्रकल्पांसह नवीन प्रकल्पांना संजीवनी देण्याचे काम करण्यात यावे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कित्तूर कर्नाटकच्या विकासासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर केला असून या भागाच्या विकासाला पूरक ठरायला हवे. बहुतांश सरकारे या भागाकडे दुर्लक्ष करत असल्याने काही दशकांपासून लोकांमध्ये वेगळेपणाची भावना निर्माण होत आई . हे टाळण्यासाठी बोम्मई यांनी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कित्तूर कर्नाटकच्या विकासाला प्राधान्य देऊन या भागातील जनतेच्या आकांक्षांना प्रतिसाद द्यावा. या भागातील आमदार आणि मंत्र्यांनी कित्तूर कर्नाटकसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

एकंदर १७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कित्तूर कर्नाटक भागाला विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी हुक्केरी हिरेमठचे चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांनी मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडे केली आहे .

Tags: