कागवाड तालुक्यातील मोळे गावचे ग्रामदैवत श्री ओघसिद्धेश्वराचा 8 वा जत्रा महोत्सव मोठया उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला .

श्री ओघसिद्धेश्वर देवाच्या जत्रेनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील श्री ओघसिद्धेश्वर देवाची पालखी, सुक्षेत्र वदरत्ती, अथणी, अचेगाव, केंपवाडा, ऐनापुर या गावातील पालख्यांचे आगमन झाले व मिरवणूक व भेट कार्यक्रमात भक्तिभावाने भाविक सहभागी झाले. गावातील सर्व भाविकांनी भक्तिभावाने पालखीचे पूजन करून भक्तिभावाने पालखीचे दर्शन घेतले.
मोळे गावातील श्री ओघसिद्धेश्वर देवाच्या पालखी मिरवणुकीत आप्पासाहेब वोडेयर, मलगौडा हलुओडेयर, आमसीद निडगुंदि , सोमलिंग वोडेयार, सिद्धलिंग पुजारी, सिद्धू वोडेयार, केंपरेवोडेर येथील वोडेयर बंधू पालखी मिरवणुकीत सामील झाले होते .

श्री ओघसिद्धेश्वराचा सखोल अभ्यास करणारे शिक्षक आप्पासाहेब भरमा वोडेय र यांनी देवाच्या महात्म्याविषयी माहिती दिली.
केंपवाड साखर कारखान्याचे एम.डी. श्रीनिवास पाटील कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले कि , कबड्डी हा देशी खेळ असून, शरीराला बळकट बनवायचे असेल तर प्रत्येकाने कबड्डीसारख्या इतर खेळात भाग घ्यावा, असा सल्ला त्यांनी दिला.
देवाच्या जत्रेनिमित्त कबड्डीचे सामने झाले. कागवाड मतदारसंघाचे आमदार श्रीमंत पाटील यांनी आपल्या श्रीमंत पाटील फाऊंडेशनच्या वतीने कबड्डी स्पर्धेतील यशस्वी संघाला प्रथम पारितोषिक 31,000/-, द्वितीय पारितोषिक 21,000/-, तृतीय पारितोषिक 11000/- व चौथे पारितोषिक 7500/- दिले.

कब्बडी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्ष भुताली थरथरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब मलमलसी, दुंडाप्पा तुगशेट्टी, महादेव बडिगेर, मुधू पुजारी, पुंडलिक गेंडा, श्रीशैल तांबोळी, राजू होंबळी, रवींद्र पुजारी, शंकर मुंजे आदींनी सहकार्य केले.
कबड्डी स्पर्धेत अथणी कागवाड, रायबाग, चिक्कोडी आणि शेजारील महाराष्ट्रातील मिरजेसह 16 संघांनी भाग घेतला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पी एन अलगुरा यांनी पंच म्हणून काम पाहिले. कब्बडी स्पर्धा पाहण्यासाठी हजारो लोक उपस्थित होते .


Recent Comments