शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जिल्हाधिकारी व इतर कार्यालयांना जोडणाऱ्या मुख्य छोट्या रस्त्याचे काम गेल्या ३-४ महिन्यांपासून संथ गतीने सुरू आहे. यामुळे वकील आणि ग्राहक तसेच जनतेचे प्रचंड हाल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच स्त्याचे काम पूर्ण करून समस्या सोडवावी, अशी मागणी ऍड . एन आर लातूर यांनी केली .
या रस्त्याच्या कामासाठी वकील व जनतेने जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असून आठ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून योग्य ती ती कायदेशीर कारवाई करू असा इशारा दिला . या रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदारांवर आणि दिरंगाईसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी वकिलांनी केली .
यावेळी ऍड . ए.बी. घोरपडे ,ऍड. आर.एन.लातूर, अनिल शिंदे , एम. के.कांबळे, यशवंत लमाणी शीतल बिलावर, एम.एस. नंदी, आर.एल. नलावडे, गजानना पावले, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments