Dharwad

कार चालकाचे नियंत्रण सुटून कार अडकली विजेच्या खांबात

Share

धारवाड येथील एसडीएम रुग्णालयासमोर कार चालकाचे नियंत्रण सुटून , ती कार फूटपाथवरील विजेच्या खांबावर अडकल्याची घटना घडली आहे.

ही कार एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरची असल्याची माहिती उपलब्ध आहे. काल रात्री उशिरा भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्यालगतच्या फूटपाथवरून उडून , ही कार विजेच्या खांबावर अडकली. कारच्या दोन्ही बाजूंचे पूर्ण नुकसान झाले आहे.अपघातानंतर कारमधील प्रवाशांनी ओळख पटू नये म्हणून दोन्ही नंबर प्लेट काढून घेतल्या आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Tags: