Belagavi

हुलबत्ते कॉलनी आणि शास्त्रीनगराला जोडणारा लोखंडी पूल पादचाऱ्यांसाठी ठरतोय धोकादायक

Share

हुलबत्ते कॉलनी आणि शास्त्री नगर यांना जोडणारा नाल्यावरील लोखंडी पुल शिथिल झाला आहे . या पुलावरील पत्रा पूर्णतः खराब झाला असून त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी येथील नागरिकांतून केली जात आहे .

शहरातील हुलबत्ते कॉलनी आणि शास्त्रीनगर याना जोडणारा मुख्य छोटा पूल गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही ठिकाणच्या जनतेचा येण्याजाण्याचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दररोज शाळकरी मुले व सर्वसामान्य नागरिकांची ये-जा होत असून, या पुलावरील पत्रा गंजून अनेक ठिकाणी भोके पडली आहेत . या पुलावरून , लहान मुलांना घेऊन जाणे धोकादायक ठरत आहे . इथून जाताना लोक जीव मुठीत घेऊन जात आहेत . याबाबत या भागातील नगर सेवक गिरीश धोंगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या समस्येबाबत प्रतिक्रिया देत या पुलाच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

लक्ष्मी मंदिराचे पुजारी संजू जोशी यांनी आपली मराठीशी बोलताना या जुन्या पुलावरून , जाताना पादचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाची कल्पना दिली .

शास्त्रीनगर तसेच हुलबत्ते कॉलनी येथील नागरिक याचा पुलावरून ये जा करतात . पालक आपल्या लहान मुलांना शाळेत सोडायला याच पुलाचा वापर करून जातात . मात्र पूल जीर्ण झाल्याने , धोकादायक ठरत आहे . त्यामुळे या भागातील रहिवाशांनी महापालिकेच्या महापौरांना हा प्रश्न त्वरीत सोडविण्याचे आवाहन केले.

एकंदर फार वर्षांपूर्वी बांधलेल्या या लोखंडी पादचारी पुलाची डागडुजी करणे खूप गरजेचे आहे . पावसाळा सुरु होण्याआधी दुरुस्ती केल्यास इथल्या नागरिकांना अनुकूल ठरणार आहे .

Tags: