बनावट शपथपत्राच्या आधारे फसवणूक करून, काळूबाळूवडी येथील कोट्यवधींची जमीन , स्वतःच्या तसेच आई आणि बहिणीच्या नावावर करून , दुसऱ्याला विक्री करीत असताना आढळून आल्याप्रकारानी , तलाठी मंडळ अधिकार्यांसह , तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत माहिती अशी कि , मिरज येथील डॉ . सचिन कुमार सुगानावर ,यांनी दिलेल्या फिर्यादीनूर, राहुल कुमार सुगानावर, आई शोभा तसेच बहीण अश्विनी देवमारे (इचलकरंजी ) बहीण स्नेहा नीटवे (पुणे ) तलाठी साईनाथ राठोड , मंडल अधिकारी गजानन वानखडे यांच्यासह अन्य लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे . काळूबाळूवाडी या गावातील जमीन , डॉ . सुगानावर याचे वडील सुकुमार सुगानावर यांनी पांडुरंग आर्वी , दगडू कांबळे व अन्य कांबळे बंधूंकडून , कायम खुशखरेदी खत करून विकत घेतली होती . भोगवटादार म्हणून सुकुमार सुगानावर अशी नोंद आहे .
वडील सुकुमार व आई मंगल हे २०१९ साली मृत झाले . परंतु त्यापूर्वी मुलगा डॉ . सचिन सुगानावर यानी आई वडिलांकडून, मृत्युपत्र करून घेतले होते . सहा महिन्यांपूर्वी त्याची जमिनीचा उतारा काढला असता त्यामध्ये सुकुमार सुगानावर यांच्या नावाखाली वारस म्हणून , त्याचे चुलत भाऊ राहुल , काकू शोभा तसेच चुलत बहीण अश्विनी वानखेडे तसेच स्नेहा नीटवे यांची नावे लागली होती . दोन खोटी प्रतिज्ञापत्रे नोंदवण्यासाठी देण्यात आली . ती तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांनी तपासणी न करता नोंद धरली .


Recent Comments