Crime

शासकीय कार्यालयाच्या आवारात शिक्षकाने घेतला गळफास

Share

शासकीय कार्यालयाच्या आवारात एका शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या आवारात घडली.

 

सिंदगी तालुक्यातील सासाबल येथील सरकारी प्राथमिक शाळेतील शिक्षक बसवराज यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे .

 

आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. तसेच शासकीय कार्यालय विशेषत: तहसीलदार कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या का केली अशी शंका उपस्थित झाली आहे.

 

पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन तपास केला. ही घटना सिंदगी पोलीस ठाण्यात घडली.

Tags: